वाहन धारकांचा उडाला थरकाप
दोडामार्ग ता.२९-: गेल्या काही दिवसांपासून हेवाळे गावातील बांबर्डे घाटीवडे विजघर येथील शेतकरी बांधव यांच्या शेती बागायती यांचे नुकसान करुन धुमाकूळ घालत असलेला चार जंगली हत्ती कळप सोमवारी मध्यरात्री चक्क दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्त्यावर चालत जात असताना आढळून आला त्यामुळे या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहन धारकांचा भितीने थरकाप उडाला.
काही मिनिटे रस्त्त्यावर चालत नंतर हा कळप रस्ता सोडून बागायती दिशेने रवाना झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शी संदेश राणे यांनी दिली.
