बांदा येथील कथाकथन स्पर्धेत कळसुलकरची सई नाटेकर प्रथम

सावंतवाडी ता.२९-:* नट वाचनालय बांदा आयोजित थोर व्यक्तींच्या जीवनातील कथात्मक प्रसंग या विषयावरील कथाकथन स्पर्धेत कळसुलकरच्या इयत्ता पाचवीतील सई स्वागत नाटेकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वाचनालयाच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सईला गौरविण्यात आले. तसेच मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत सईने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

प्रमाणपत्र व पुस्तक देऊन तिला गौरविण्यात आले. या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक एन.पी. मानकर, संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डाॅ. प्रसाद नार्वेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्यावतीने सईचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page