दिवंगत चिरंजीव समीर पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेच्या विधायक कार्यासाठी दिली देणगी
मालवण ता.२९-:* कोरोना काळात संस्था पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या माजी विद्यार्थिनी शीला दिलीप पाटील यांनी आपले दिवंगत चिरंजीव समीर दिलीप पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेच्या विधायक कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, स्कुल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालिका स्वाती वराडकर आदी उपस्थित होते.
