सावंतवाडी ता.२९-: चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेला अपघात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात आज सकाळी १०.३० च्या सुमारास कारिवडे येथे घडला.
विठ्ठल राजेंद्र तोटावाड वय 32 सध्या सावंतवाडी मूळ नांदेड असे जखमींची नाव आहे. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार करण्यात आले.तर त्याचा उजवा पाय व हात फ्रॅक्चर झाल्याने अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
