युवासेनेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पसरला उत्साह

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत

कणकवली ता.२९-:* राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शेकडो युवासैनिकांच्या वतीने पर्यटनमंत्री नाम.आदित्य ठाकरे यांचे देवगड येथील कुणकेश्वर तिठा एमटीडीसी नजीक ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशांत नाईक यांनी देवगड हापूस आंब्यांचा हार घालत सन्मानचिन्ह भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

नाम.आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे युवासेनेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक लावण्याची विनंती केली. आदित्य ठाकरेंचा विजय असो…कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला…शिवसेना झिंदाबाद अशा घोषाणां देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, देवगडात आदित्य ठाकरे यांचा दौरा असलेल्या मार्गावर सुशांत नाईक यांच्यावतीने स्वागताकरिता कमाणी उभारण्यात आल्या होत्या. तसेच रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावून हा परिसर भगवामय करण्यात आला होता. तर आदित्य ठाकरे यांचे देवगड येथील कुणकेश्वर तिठा एमटीडीसी येथे स्वागत केल्यावर तेथून नियोजित कार्यक्रम स्थळी ठाकरे यांच्या सोबत युवासेनेच्या कार्याकर्त्यांचा ताफापुढे मार्गस्थ झाला.

यावेळी खासदार विनायक राऊत, आम.वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,शिवसेना नेते संदेश पारकर, नगरसेवक कन्हैया पारकर, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना माजी जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, देवगड तालुका प्रमुख अमेय जठार, निनाद देशपांडे, कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, वैभववाडी तालुकाप्रमुख अतुल सरवटे, वैभववाडी तालुका चिटणीस रोहित पावसकर, कणकवली तालुका समन्वयक गुरू पेडणेकर, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे, सौरभ माने, दिनेश वाळके, सिद्धेश माणगावकर, गणेश गावकर, उपशहर प्रमख सोहम वाळके,अमित मयेकर,विभाग प्रमुख सिद्धेश राणे, तेजस राऊत, आकाश गुरव, गणेश वाळके, शरद सरंगले, रोहित रावराणे, आबु मेस्त्री, संजय सावंत, सचिन आचरेकर, परेश आचरेकर,भूषण कोळसुलकर, रोहित रावराणे, सिद्धेश रावराणे, सिद्धू गावडे, प्रथमेश तळेकर, जयेश पवार, राजेश पवार, सागर पवार, प्रथमेश तळेकर, फरीद काझी, अमित मयेकर, शरद सरंगले, भूषण परुळेकर, रिमेश चव्हाण, विनय हडकर, वैभव मराठे, नितीन जेठे, फरिद काझी, आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page