कोकण भूमी प्रतिष्ठान संस्थेचे कोकण आयडॉल पुरस्कार
वेंगुर्ले ता.२९-:* कोकण भूमी प्रतिष्ठान-समृध्द कोकण प्रदेश संघटनेने महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात जनतेसाठी महत्वपूर्ण कामगिरी करणाऱया व देशांत नावलौकीक मिळविलेल्या अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ग्लोबल कोकण उद्योग परीषदेत कोकण आयडॉल या पुरस्काराने मुंबई येथील कार्यक्रमांत सन्मान केला. वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्लेत शुन्य कचरा नियोजन प्रकल्प गेल्या 5 वर्षात यशस्वीपणे राबविला. संपूर्ण भारत देशांत वेंगुर्ले नगरपरीषदेच्या शून्य कचरा नियोजनाचे धडे गिरविण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सर्व नगरसेवक व प्रशासनाचे कर्मचारी तसेच नागरीकांना विश्वासांत घेऊन काम केले. या महत्वपूर्ण कामासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कोकल आयडॉल या पुरस्काराने त्यांचा सत्कार व सन्मान करण्यांत आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांत विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परीषद सदस्य निरंजन डावखरे, पितांबरी प्रोडय़ुसर प्रायव्हेट लिमीटेडचे अध्यक्ष रविंद्र प्रभू-देसाई, महाराष्ट्र राज्य कृषिपणन मंडळाचे व्यवस्थापकिय संचालक सुनिल पवार, किसान कनेक्टचे अध्यक्ष सारंग निर्मळ, सिडकोचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत संघवी, वेंगुर्लेचे मावळते नगराध्यक्ष दिलीप गिरप, कोकण सृष्टीचे संचालक दिलीप शिर्के, पुनीत गौरवचे संचालक गौतम प्रधान, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारीया, कोकण भूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव आदींचा समावेश होता. या कार्यक्रमांत संपूर्ण देशांत शुन्य कचरा नियोजन यशस्वी राबविणारे वेंगुर्लेत नगरपरीषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे राज्याचे विधान परीषद विरोधी पक्षतेने प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्रित असलेला स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यांत आला. यावेळी वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना बोलण्यासाठी दिलेल्या संधीवेळी श्री. गिरप यांनी वेगुर्ले नगरपरीषदेच्या 5 वर्षातील कारभारात केवळ स्वच्छताच नव्हे तर शहरातील सर्व प्रकारच्या पायाभुत सोयी-सुविधांची पुतर्ता नियोजन बध्द कशी केली.
तसेच स्वछतेच्या कामात 5 वर्षात 9 विविध स्वच्छतेचे पुरस्कार प्राप्त केले. या पुरस्कारातून मिळालेल्या बक्षिस रकमेतून स्वच्छतेच्या दृष्टीने अत्याधुनिक असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच अत्याधुनिक पायाभुत सोयी-सुविधा निर्माण करीत सर्वागीण विकास साधल्याचे स्पष्ट केले. तसेच 5 वर्षात केलेल्या स्वच्छतेच्या कामांत सातत्य राखून शुन्यकचरा व्यवस्थापन केल्याची दखल सी.बी.एस.सी. बोर्डाने घेऊन सी.बी.एस.सी.च्या अभ्यासक्रमांत वेंगुर्ले नगरपरीषदेच्या स्वच्छतेचा अभ्यास समाविष्ट केला आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थी वेंगुर्लेच्या स्वच्छतेच धडे गिरवणार आहेत. हे काम माझे एकटय़ाचे नाहि तर सहकारी सर्व नगरसेवक, प्रशासन व नागरीक यांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले असल्याचे स्पष्ट केले. केलेल्या कामांमुळे भविष्यात नगरपरीषदेचे उत्पन्न वाढीसाठी मोठा फायदा होईल. यासह स्वच्छता व महत्वपूर्ण विकास कामांची माहिती पॉवर प्लँंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमांस उपस्थित असलेल्या मान्यवरांसमोर मांडली. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सादर केलेल्या माहितीने सभागृहातील सर्वच मान्यवर खुष झाले. सर्वाना सभागृहात उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत वेंगुर्ले नगराध्यक्षांनी नगरसेवक, प्रशासन व नागरीक यांच्यात समन्वयाचे नियोजन साधून केलेल्या या गौरवास्पद कामाबाबत मानवंदना दिली. हे बाब वेंगुर्ले वासियांसह भुषणावह ठरली आहे.
