Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवसेनेकडून गोठणेत भाजप पक्षाला धक्का;

भाजप सरपंच शिवसेनेत दाखल मालवण ता.३१-:* आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेशांचे सत्र सुरू केले असून गोठणे गावात भाजपला धक्का दिला आहे. भाजप पक्षाच्या गोठणे गावच्या सरपंच श्रेया चव्हाण व माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गोठणे कोंडवाडी येथे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून…

Read More

बैल झुंज प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू

पोलीस अधीक्षक दाभाडे यांची माहिती ओरोस ता.३१-:* जिल्ह्यात झालेल्या झुंज प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. या झुंजीमुळे एका बैलाचा जीव गेला आहे. त्यामुळे कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कणकवली डीवायएसपी व मालवण पोलीस अधिकारी यांनी झुंज झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे…

Read More

पक्षाध्यक्ष शरद पवार यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक…

अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे आंदोलन कुडाळ ता.३१-:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने करून जनतेमध्ये त्यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत यांचा पुतळा दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Read More

मॅक्सी कार्डोज यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार

वेंगुर्ला प्रतिनिधी– स्व. मुरलीधर उर्फ बंडोपंत भिसे यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटोग्राफीत योगदान देणा-या व उत्कृष्ठ फोटोग्राफी करणा-या अशा जिल्ह्यातील छायाचित्रकारांस सावंतवाडीतील अनिल भिसे मित्रमंडळामार्फत गेले तीन वर्षे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे सल्लागार व माजी अध्यक्ष तथा दै. पुढारीचे पत्रकार मॅक्सी कार्डोज यांना जाहिर झाला असून ३०…

Read More

भिरवंडे खलांतर खरलवाडी येथे बिबट्याचे पुन्हा दर्शन

नागरिकांत भीतीचे वातावरण कणकवली 31 मार्च (प्रतिनिधी)-कणकवली तालुक्यातील भिरवंडे खलांतर खरलवाडी येथे सकाळी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्थानिकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. भिरवंडे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खरलवाडी येथे 23 मार्चला अनिल सावंत या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले…

Read More

पर्यटन विकासमंत्र्यांच्या दौऱ्यात सिंधुदुर्गला २३ कोटी १३ लाख

राजकीय संघर्षासाठी नाहीतर पर्यटन विकासासाठी आदित्य ठाकरे आले होते;पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती ओरोस ता.३१-:* पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा राजकीय संघर्षासाठी नव्हता तर पर्यटन विकासासाठी होता. या दौर्‍यात त्यांनी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासच्या पर्यटन विकासासाठी २३ कोटी १३ लाख निधीची घोषणा केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी…

Read More

आरोंदा-बायपास-किरणपाणी रस्त्याचे भूमिपूजन

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत उपसरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी ता.३१-: आरोंदा – बायपास – किरणपाणी या रस्त्याचे भूमिपूजन आज शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या रस्त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे . यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर…

Read More

बांद्यात शिमगोत्सव व रंगपंचमी उत्साहात साजरी

बांदा ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या बांदा शहरात पंधरा दिवसांचा शिमगोत्सव व रंगपंचमी बांदावासियांनी उत्साहात साजरी केली. कोरोनाचे संकट टळल्यानंतर बांदावासीयांनी रंग उधळत रंगमंचमी व शिमगोत्सव उत्साहात साजरा केला. होळी पौर्णिमेपासुन सुरु होणारा बांद्याचा शिमगोत्सवात गेले पंधरा दिवस विविध पारंपारिक विधींचे कार्यक्रम भक्तीमय वातावरणात सपन्न झाले.

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयात शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल रोजी होणार कार्यक्रम सावंतवाडी ता.३१-: भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर व कथकनृत्य पंडित बिरजू महाराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी पंचम खेमराज महाविद्यालयात शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रात…

Read More

रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित हे लोकप्रतिनिधीचे अपयश

परशुराम उपरकर यांचा टोला;केवळ ठेकेदारी मिळणाऱ्या विकासासाठी नेत्यांची धडपड कणकवली ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवेची दुरावस्था झाली आहे याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनेसाठी निधी जाहीर करताहेत. हेच लोकप्रतिनिधी जनतेच्या गरजांकडे पाहत नाहीत.आरोग्य सेवा अत्यावश्यक आहे.मात्र,जिल्हा रुग्णालयात व कणकवली उपजिल्हा रुग्णालय व अन्य रुग्णालयातील वीज बिल थकीत असल्याने विजेचा पुरवठा बंद…

Read More
You cannot copy content of this page