परशुराम उपरकर यांचा टोला;केवळ ठेकेदारी मिळणाऱ्या विकासासाठी नेत्यांची धडपड
कणकवली ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवेची दुरावस्था झाली आहे याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनेसाठी निधी जाहीर करताहेत. हेच लोकप्रतिनिधी जनतेच्या गरजांकडे पाहत नाहीत.आरोग्य सेवा अत्यावश्यक आहे.मात्र,जिल्हा रुग्णालयात व कणकवली उपजिल्हा रुग्णालय व अन्य रुग्णालयातील वीज बिल थकीत असल्याने विजेचा पुरवठा बंद करण्यात आला,हे लोकप्रतिनिधीचे अपयश असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. लोकप्रतिनधी जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोक अपयशी ठरले आहेत.जिल्ह्यात तीन स्त्री रोग तज्ञ आहेत मात्र यातील एक निवृत्तीच्या उंबरठ्यावर तर अन्य एक आजारी तर उर्वरित एक शिक्षणासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे जिल्ह्यात तील रुग्णांची अवस्था बिकट होणार आहे .त्यामुळे लहान मुलांना,महिलांना कमी दरात उपचार होताहेत,ते बंद होतील.त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी ३० ते ५० हजार रुपये सामान्य जनतेची लूट होणार आहे.त्यामुळे सत्ताधारी लोकांनी जनतेची लूट थांबवण्यासाठी काम करावे,अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली.
आरोग्य सेवा सामन्यांची गरज आहे.जिल्हा शल्य चिकित्सक नाहीत,सेवा मिळत नाही.आरोग्य सेवा मिळत नसेल तर विकास काय उपयोगाचा असा सवाल करताना परशुराम उपरकर म्हणाले, रस्ते, इमारती, पूल यासाठी लोकप्रतिनिधी व नेत्यांची धावाधाव आहे.कोणत्याही प्रकारच्या पध्दतीने रिक्त पदे व आरोग्य सेवेसाठी काम करत नाहीत.सर्व कार्यालयात दूरध्वनी बंद झाल्याने सामान्य माणसाला संपर्क करता येत नाही.सर्व अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पुस्तिका तयार करावी.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर चुकीचे नंबर आहेत, याबद्दल जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला. तातडीने जिल्हा माहिती आधिकऱ्यांमार्फत अंमलबजावणी केली जाईल,असे आश्वासन दिल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.
