बैल झुंज प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू

पोलीस अधीक्षक दाभाडे यांची माहिती

ओरोस ता.३१-:* जिल्ह्यात झालेल्या झुंज प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. या झुंजीमुळे एका बैलाचा जीव गेला आहे. त्यामुळे कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कणकवली डीवायएसपी व मालवण पोलीस अधिकारी यांनी झुंज झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.

You cannot copy content of this page