भाजप सरपंच शिवसेनेत दाखल
मालवण ता.३१-:* आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेशांचे सत्र सुरू केले असून गोठणे गावात भाजपला धक्का दिला आहे. भाजप पक्षाच्या गोठणे गावच्या सरपंच श्रेया चव्हाण व माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गोठणे कोंडवाडी येथे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाल घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी गोठणे कोंडवाडी येथे आ. वैभव नाईक यांनी आपल्या फंडातून मंजूर केलेल्या स्ट्रीटलाईटचे भूमिपूजन सरपंच श्रेया चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कामासाठी ५ लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना गोठणेच्या वतीने आयोजित आमदार चषक अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील खुल्या गटातील विजेता ओसरगाव रुपी इलेव्हन व उपविजेता श्री ब्राम्हणदेव आचरा संघ तसेच १५ वर्षाखालील झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेता वरवडे संघ व उपविजेता किर्लोस संघ यांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
तसेच सहभागी ३८ संघांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच डेकोरेटर संजय लाड यांनाही सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, किर्लोस सरपंच प्रदीप सावंत, रामगड सरपंच विलास घाडीगावकर, माजी सरपंच दुलाजी परब, गोठणे शाखा प्रमुख सचिन हाटले, सुभाष धुरी,जयराम परब, ग्रा. प. सदस्य अर्चना मुणगेकर, विजय परब, चंद्रकांत लाड, चेतन लाड, महादेव सावंत, भिवा लाड, प्रशांत लाड, किर्लोस शा. प्र. विकास लाड, गणेश घाडीगावकर, सुष्मा लाड, सुगंधा लाड, अनघा लाड, अनुष्का परब, अंजली हाटले, जयश्री परब, राजश्री परब, रेश्मा हाटले, बाळू कुवरे, प्रकाश हाटले, गजानन हाटले, भगवान हाटले, लोचन पालांडे, रामचंद्र जाधव, नरेश लाड आदि उपस्थित होते.
