हुतात्मा रेगे स्मारक रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

आ वैभव नाईक यांनी दिला १० लाखांचा निधी

मालवण ता.३१-:* कसाल- मालवण मुख्य रस्ता ते कुंभारमाठ येथील हुतात्मा रेगे स्मारकापर्यंत जाणारा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त बनल्याने या रस्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी १० लाख निधी मंजूर करून घेतला. या कामाचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सभापती मधुकर चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी सरपंच प्रमोद भोगावकर, उपसरपंच बाळ माने, सदस्य प्रणिता लंगोटे, अदिती परुळेकर, भाई पवार यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शिक्षक या स्थानिकांसह युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरस्कर, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

स्थानिक ग्रामस्थ रहिवाशी यांच्या मागणीनुसार रस्त्यासाठी अखेर निधी उपलब्ध झाल्याने स्थानिक रहिवाशी प्रभुखानोकर सर यांनी ग्रामस्थांच्या वतीने हरी खोबरेकर, सरपंच प्रमोद भोगावकर, उपसरपंच बाळ माने, ग्रामसेवक गणेश नलावडे यांचा सत्कार करत विशेष आभार मानले. तसेच हुतात्मा स्मारक ते खैदा हा रस्त्याचा पुढील एक किलोमीटर टप्पाही लवकर पूर्ण करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

You cannot copy content of this page