तळगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मालवण ता.३१-:* मालवण तालुक्यातील तळगाव-सुकळवाड विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक सर्व पक्षीय माध्यमातून बिनविरोध करण्यात आली.

जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्या पुढाकाराने तळगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊन यास माजी सभापती अजिंक्य पाताडे, प्रसाद दळवी, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर, चेतन मुसळे, जगदीश चव्हाण, प्रकाश पावसकर, भाई राणे यांचे सहकार्य लाभले. तळगाव- सुकळवाड सोसायटी मध्ये कृष्णा बाबुराव पाताडे, प्रकाश चंद्रकांत पावसकर, प्रसाद दळवी, चेतन प्रमोद मुसळे, समृद्धी सागर कुशे, प्रवीण जावकर, महेश परब, सूर्यकांत दाभोलकर, नरेंद्र सदाशिव पाताडे, दिलीप दळवी, वर्षा वसंत वाळके, वासुदेव दळवी, राजेंद्र दळवी या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. सर्व सदस्यांचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले व सोसायटीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page