मॅक्सी कार्डोज यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार

वेंगुर्ला प्रतिनिधी– स्व. मुरलीधर उर्फ बंडोपंत भिसे यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटोग्राफीत योगदान देणा-या व उत्कृष्ठ फोटोग्राफी करणा-या अशा जिल्ह्यातील छायाचित्रकारांस सावंतवाडीतील अनिल भिसे मित्रमंडळामार्फत गेले तीन वर्षे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे सल्लागार व माजी अध्यक्ष तथा दै. पुढारीचे पत्रकार मॅक्सी कार्डोज यांना जाहिर झाला असून ३० मार्च रोजी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष भुपेंद्र सावंत यांचे हस्ते श्री. कार्डोज यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी फिलोमीना कार्डोज, आँस्टीन कार्डोज, जुलिया कार्डोज, वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य भरत सातोस्कर, वेंगुर्ला पत्रकार संघाचे सदस्य अजय गडेकर, योगेश तांडेल, प्रथमेश गुरव, अनिल भिसे मित्रमंडळाचे संस्थापक अनिल भिसे, पदाधिकारी अरूण भिसे, रत्नाकर माळी, जतिन भिसे, बेन्जामिन फर्नांडीस, गणेश हरमलकर, बँण्ड डिसोजा, अँन्थोनी फर्नांडीस, अनंत मेस्त्री आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page