आरोंदा-बायपास-किरणपाणी रस्त्याचे भूमिपूजन

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत उपसरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी ता.३१-: आरोंदा – बायपास – किरणपाणी या रस्त्याचे भूमिपूजन आज शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या रस्त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे .

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, विभाग प्रमुख बाबा केरकर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश नाईक, प्रशांत नाईक, उपशाखाप्रमुख बाबी गावडे, बबन गावकर, संतोष पेडणेकर, बाळा आरोंदेकर, शेखर पोखरे, प्रमोद नाईक, बाबा नाईक, आनंद नाईक, शिवाजी कोचरेकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page