पर्यटन विकासमंत्र्यांच्या दौऱ्यात सिंधुदुर्गला २३ कोटी १३ लाख

राजकीय संघर्षासाठी नाहीतर पर्यटन विकासासाठी आदित्य ठाकरे आले होते;पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

ओरोस ता.३१-:* पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा राजकीय संघर्षासाठी नव्हता तर पर्यटन विकासासाठी होता. या दौर्‍यात त्यांनी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासच्या पर्यटन विकासासाठी २३ कोटी १३ लाख निधीची घोषणा केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषद घेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याबाबत माहिती दिली.

यावेळी त्यांनी पर्यटन मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत ,हा दौरा राजकीय संघर्षासाठी होता की विकासासाठी होता ? याची चर्चा जिल्ह्यात रंगवली जात होती. मात्र हा दौरा राजकीय संघर्षासाठी नव्हता तर पर्यटन विकासासाठी होता हे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. या जिल्ह्यात आमचे अधिक आमदार आहेत. त्यामुळे संघर्ष कुणाशी करायची गरज नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page