मालवण शहरातील हेरिटेज वृक्षांच्या माहिती संकलनाचे काम नगरपालिकेकडून सुरू
मालवण ता.०८-:* पर्यावरण संवर्धनासाठी मालवण नगरपरिषदेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. मालवण शहरात अनेक वर्षांपासून शहराच्या विकासाचे साक्षीदार असलेल्या, पर्यावरण संतुलनात भर घालून शहराच्या आरोग्यदायी वातावरणात मोठा वाटा असलेल्या ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोमान असणाऱ्या “हेरीटेज वृक्षाच्या” माहिती संकलनाचे काम मालवण नगरपरिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. मालवण शहरात असे हेरीटेज वृक्ष असल्यास…
