मालवण ता.०८-:* मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण या पदविका अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेमधील तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी,यंत्र अभियांत्रिकी,विद्युत अभियांत्रिकी व अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये शिकणाऱ्या ८४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो, फ्लीपकार्ट, डेटास्टेक, ऍडविक टेक्नोलॉजी या विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
याव्यतिरिक्त एल.एन.टी. ,इन्फोसिस , जी.ई. ,टी.सी.ई. , टाटा मोटर्स आदी अनेक इंडस्ट्रीजमध्ये विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया चालू आहे. मालवण तंत्रनिकेतन मधील प्रा.एस.एस.जोशी, अधिव्याख्याता, संगणक अभि. प्रा.टी.व्ही.मिटके, प्र.विभाग प्रमुख संगणक अभि. प्रा.आर.डी.पेंदाम, प्र.विभाग प्रमुख यंत्र अभि.,प्रा. डी. एन. गोलतकर, प्र.विभाग प्रमुख शास्त्र, प्रा.सी. जी.इंगोले, प्र.विभाग प्रमुख विद्युत, प्रा.डॉ.वाय.व्ही.महाडिक, शैक्षणिक समन्वयक, प्रा.डॉ. एस. एस. चोपडे, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी तथा विभाग प्रमुख अणुविद्युत अभि. यांच्या मार्गदर्शनामुळे व अविरत परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
संस्थेचे प्राचार्य डॉ. एस ए.पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधून विविध कंपन्यांमध्ये निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:- संगणक अभियांत्रिकी विभाग- सई संजय चोपडे, हर्षलक्ष्मी पाटकर, यंत्र अभियांत्रिकी विभाग- आयान बखतीयार खान, भक्ती विश्राम साळगावकर, भूषण महेश सरंगले, चैतन्य रवींद्र केसरकर, चेतन रमेश गोवेकर, दिवाकर राजाराम वेंगुर्लेकर, दुर्वांकुर सखाराम हरमलकर, सूरज सतिश गिरकर, हृतिक धोंडी सावंत, जयेश सुधीर पार्टे, काशिनाथ गुरुनाथ पारकर, आदित्य आनंद खाडिलकर, कोमल पांडुरंग कामत, मनिष ठकोजी डामरे, सिद्धेश गुरुदत्त मयेकर, निमेष उल्हास वेंगुर्लेकर, ओमकार अनिल तायशेटे, ओमप्रसाद गजानन राणे, ओमश्री दशरथ पवार, पंकज गणू राऊळ, प्राजक्ता भरमणा वाणी, प्राजक्ता ज्ञानेश्वर गवस, प्रथमेश प्रमोद खडपकर, प्रथमेश मंगेश माळगावकर रघुनंदन संजीव बादेकर, राहुल प्रवीण मेस्त्री, राजस हेमंत केगडे, रत्नाकर मारोती झळके, साक्षी राजू मोरजकर, सर्वेश संजय गावडे, सौरभ सुभाष तेली, शांताराम प्रकाश कदम, अनामिका अविनाश शिरोडकर, शिवराम प्रविण परब, शुभम धनंजय कोळगे, शुभम् सुहास गावडे, स्वाती धोंडी वरक, तुकाराम विष्णू सावंत, उझेर अब्दुल्ला शेख, वरद जयेश गावडे, विनायक मंगेश प्रभू, विशाल सत्यवान घाडी, विठ्ठल गोपाळ शेटकर, आदित्य महेश शिंदे विद्युत अभियांत्रिकी विभाग- अभिषेक विनायक भोसले, चारुता उमाकांत मयेकर, दामिनी दत्ताराम कविटकर, हेमाली अर्जुन मंचेकर, मंदिरा महेश सावंत, राजश्री मधुसूदन चव्हाण, साक्षिता संतोष परुळेकर. अणुविद्युत अभियांत्रिकी विभाग- अक्षय भिकाजी केसरकर, प्रणव देवेंद्र चव्हाण, गायत्री प्रवीण जोशी, जितेन प्रकाश बिर्जे, जितेश केसरकर, जितेश मंगेश पांचाळ, कृतिका अशोक बागवे, ओमकार भारत धुरी, श्रेयस दशरथ पाटकर, स्नेहा संतोष नाईक, सूचिता उत्तम नाईक, तेजस विनोद वस्त, तेजश्री मुकुंद लाड, लौकिक मिलिंद निर्गुण.
