मालवण ता.०८-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन सुनितादेवी अध्यापक महाविद्यायलाचे प्रा. नागेश कदम यांनी मालवण येथील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्तम शासकीय मुलांच्या वसतीगृह येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. नागेश कदम हे बोलत होते. यावेळी वसगीगृहाचे गृहपाल के. एस. इंदलकर, संग्राम कासले, सिद्धीविनायक चिपकर, मुकेश सावंत, अमित जाधव आदि उपस्थित होते. प्रारंभी संतोष डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. नागेश कदम यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रा. नागेश कदम म्हणाले,
विद्यार्थी अवस्थेत विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या अवस्थेत आपल्याला अनेक मोहाचे क्षण निर्माण होत असतात. या क्षणांना दूर सारून आपण अभ्यास याच ध्येयाकडे मार्गक्रमणा केली पाहिजे. यावेळी गृहपाल के. एस. इंदलकर यांनी सामाजिक समता सप्ताहाच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. संग्राम कासले यांनी मनोगत व्यक्त केले. आभार सिद्धीविनायक चिपकर यांनी मानले.
