मालवण शहरातील हेरिटेज वृक्षांच्या माहिती संकलनाचे काम नगरपालिकेकडून सुरू

मालवण ता.०८-:* पर्यावरण संवर्धनासाठी मालवण नगरपरिषदेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. मालवण शहरात अनेक वर्षांपासून शहराच्या विकासाचे साक्षीदार असलेल्या, पर्यावरण संतुलनात भर घालून शहराच्या आरोग्यदायी वातावरणात मोठा वाटा असलेल्या ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोमान असणाऱ्या “हेरीटेज वृक्षाच्या” माहिती संकलनाचे काम मालवण नगरपरिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

मालवण शहरात असे हेरीटेज वृक्ष असल्यास त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी माहिती सहीत वृक्षाचा फोटो 8605171010 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा comalvan@gmail.com या ईमेल आयडी वर मालवण नगरपालिकेला पाठवाव आणि पर्यावरण रक्षणाच्या या कार्यात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी झाडाच्या फोटो सोबत झाडाचे नाव, झाडाचे वय, त्या झाडाचे महत्व (उदाहरणार्थ काही झाडे आस्थेचा भाग असू शकतात, काही झाडे फळे-फुले देणारी असू शकतात तर काही झाडे पक्षांना आसरा देऊन जैवविविधता टिकवण्यात मोलाचा वाटा उचलणारी असू शकतात. वृक्षांबाबत इतर अनेक महत्वाच्या गोष्टी असू शकतात.) झाडाचे स्थान, फोटो पाठविणाऱ्या नागरिकाचे नाव व मोबाईल नंबर अशी माहिती द्यावयाची आहे.

You cannot copy content of this page