मालवण ता.०८-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण व सिंधुदुर्ग शिक्षक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाथ पै जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे झाली. परीक्षेत हायस्कूलमधील २४५ विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धा परीक्षेचा उद्घाटन समारंभ शालेय समिती अध्यक्ष व पत्रकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. दीपक भोगटे यांनी विद्यार्थ्यांना नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.
मुख्याध्यापक कांबळी यांनी परीक्षेचे महत्व समजावून या सांगितले. संजय नाईक यांनी या जन्मशताब्दी वर्षात वराडकर हायस्कूल व सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला व सेवांगणला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळी, बापू वराडकर, संजय नाईक, सौ. राऊळ, भाट, वाजंत्री, दीपक भोगटे, श्रीधर गोंधळी उपस्थित होते.
