मालवण ता.०८-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. निबंध स्पर्धेत कणकवली येथील श्रद्धा सतीश पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
तर कुडाळ येथील शितल किरण कदम यांनी द्वितीय तर मालवणच्या माधवी लिलाधर तिरोडकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारीतेतील योगदान असा निबंध स्पर्धेचा विषय होता. स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निबंध स्पर्धेला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण डी. एड. कॉलेज मालवणचे प्राध्यापक नागेश कदम यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समतादूतांनी मेहनत घेतली.
