आ दीपक केसरकर यांचा प्रयत्न;विजय गावडे, अभिजित मेस्त्री यांची माहिती
सावंतवाडी ता.०८-:* आंबोली घाटाला एक उत्तम पर्याय असणाऱ्या आंबोली-चौकुळ-कुंभवडे-बांदा रस्त्यावरील कुंभवडे ते तळकट रस्त्याचा काही भाग अपूर्ण अवस्थेत होता. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करण्यासाठी नागरिकांना अवघड जात होते. या रस्त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी राज्य शासनाच्या बजेट मधून मंजुरी मिळवली असून, या रस्त्यामुळे आता कुंभवडे आणि खडपडे गावातील लोकांना वाहतुकीची सोय निर्माण होणार आहे.
अशी माहिती माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय गावडे आणि ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेस्त्री यांनी दिली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, या रस्त्यामुळे आंबोली-चौकुळ-कुंभवडे-खडपडे या गावांना पर्यटन दृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार असून, पर्यटनातून या गावांचा विकास होणार आहे. तसेच पर्यटनावर आधारित रोजगार देखील त्यामुळे निर्माण होणार आहेत. यावेळी चौकुळ-कुंभवडे-खडपडे-तळकट भागातील ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
