मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी
सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यात मिरची, भुईमूग, वायंगणी भातशेती, चवळी ,आंबा, काजू, सूर्यफूल, केळी बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.
