देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;सावंतवाडी शिवसेनेचे पोलिसांना निवेदन
सावंतवाडी ता.०८-:* आय एन एस यांच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्यात यावे. अशी मागणी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, रुपेश राऊळ, गुणाजी गावडे, योगेश नाईक, विशाल सावंत, गजानन नाटेकर, नारायण राणे, तानाजी वाडकर, विश्वास घाग, नामदेव नाईक, विनायक सावंत, महेश सावंत, एकनाथ हळदणकर, विनोद ठाकूर, संजय माजगावकर, सुनील गावडे, भारती मोरे, दिपाली सावंत, शुभांगी सुकी, भारती परब, लतिका सिंग, सायली होडवडेकर, शिवानी पाटकर, सीमा सोनटक्के, गीता सुकी, अनुष्का कलमिलकर, पूजा नाईक, निता कुपडेकर, सुप्रिया धारणकर, उल्का पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
