धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

मालवण ता.०७-:* मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दि.११ ते १४ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. नारायण मंदिर देऊळवाडा, मालवण येथून मिरवणूक एसटी स्टॅन्ड भरड नाका बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिर पर्यंत ढोल ताश्यांच्या गजरात श्रीकृष्ण मूर्ती व कलश यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत चित्ररथ, वारकरी दिंडी, भजनाचा गजर तसेच कोंबडा हत्ती मोर यांचे नृत्य यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ, आंदूर्ले यांचा ५१ पखवाज अलंकार नादब्रम्ह मुदूंगनाद तबला पखवाज ढोलकी कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून प्रायश्चित्त संकल्प आणि पंचगव्य प्राशन, देवतांना नारळ, विडे व्दारा आमंत्रण प्राधन संकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राध्दं, आचार्यवरण, आचार्यकर्म, मंडपप्रोक्षण, शांतीहोम, जलाधिवास देवतास्थापन, अग्निस्थापन, अग्निसंस्कार, निद्राकलश स्थापन वास्तू ग्रहयज्ञ हवन प्रासाद वास्तू स्थापन आदी धार्मिक विधी होणार आहेत. तर सायं. ६ वा. किर्तन (ह. भ. प. श्री. प्रभुदास आजगांवकर), सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ १० वा. धुरीवाडा प्राथमिक शाळा व स्थानिक कलाकारांचा व्हरायटी शो होणार आहे. बुधवार १३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. पासून पर्याय हवन, पिंडीको स्नपन, तत्त्व हवन, निद्राकलश विसर्जन आदी धार्मिक विधी होणार आहेत.

तर सायंकाळी ६ वा. किर्तन (ह. भ. प. सौ. मेधा शेवडे), सायं. ७ वा. संगीत भजन, रात्री १० वा. R.D.X. व्हरायटी शो (सावंतवाडी) सादर होणार आहे. गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. पासून पिंडीका तत्त्वन्यास, पिंडिका, प्रार्थना, प्रासाद अलंकार शिखरंकलश ध्वज स्थापना, देवता स्थापना देवता तत्त्वन्यास देव प्राणप्रतिष्ठा, देवता पूजन, पूजांग हवन, पूर्णाहूति, बलिदान अभिषेक, होम प्रार्थना सांगता संकल्प दक्षिणादान, महानैवेद्य आणि आरती आदी धार्मिक विधी होणार आहेत. तर दुपारी १ ते ३ वा. पर्यंत महाप्रसाद, सायं. ६. वा. किर्तन (ह. भ. प. श्री. विनोद सातार्डेकर), सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ १० वा. श्री कलेश्वर दशावतार नाटयमंडळ, नेरुर यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यविष्कार ‘अजिंक्यतारा’ सादर होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळ, धुरीवाडा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page