माडखोल येथे पर्यटकांची स्विफ्ट कार पलटी…
दुपारी अडीच ची घटना:सहा प्रवासी किरकोळ जखमी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सांगलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी पर्यटकांची स्विफ्ट कार (एम.एच. ४३ एक्स ६९९५) माडखोल येथील सावली हॉटेलजवळील वळणावर पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते. अपघातात सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली…
