⚡मालवण ता.०६-:
मसुरे देऊळवाडा येथील श्री कमरादेवीचा त्रैवार्षिक उत्सव दि. ९ मे रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त शुक्रवार ८ रोजी दु. ३ वा. स्थानिक महिलांसाठी कार्यक्रम, रात्री ९ वा. स्थानिक मुलांचे रेकॉर्ड डान्स, यात खास आकर्षण ‘स्वामी महिमा”. शनिवार दि. ९ रोजी सकाळी ९ वा. कमरादेवीच्या ओट्या भरणे, दुपारी २ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वा. स्थानिक ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वा. बक्षीस वितरणं समारंभ, १० वा. सिंधुकन्या प्रस्तुत, प्रणाली कासले निर्मित ‘लावण्यखणी” कार्यक्रम आणि हिंदी-मराठी नृत्य, गीतांचा सुरेल नजराणा पाहायला मिळेल. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कमरादेवी सुतार समाज मंडळ, स्थानिक कार्यकारिणी, मुंबई कार्यकारिणीने केले आहे.
