खानोलीची सुकन्यानिशा केळकर हिचीजागतिक पातळीवरील परीक्षेसाठी “वैज्ञानिक निरिक्षक” म्हणून निवड…

⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील खानोली देऊळवाडी येथील रहिवासी आणि सध्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे ‘सहाय्यक प्राध्यापिका’ (फिजिक्स) म्हणून कार्यरत असलेच्या निशा नरसिंह केळकर हिची जागतिक स्तरावरील ‘ऑलिंपियाड परीक्षेसाठी भारत सरकारतर्फे वैज्ञानिक निरीक्षक (Scientific Observer) म्हणून निवड झाली आहे. वेंगुर्ला मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. के.जी.केळकर यांची निशा ही भगिनी होय. दरवर्षी १२ वी मधील मुलांची देशस्तरावर परीक्षा घेऊन त्यातील ५ मुले जागतिक स्तरावरील ऑडिंपियाड परीक्षेसाठी निवडली जातात.”ऑलिंपियाड” मध्ये सहभागी होणाऱ्या ७० ते ७५ देशातील मुलांची एकत्रित परीक्षा येऊन त्यातुन सुवर्णपदक, ब्राँझपदक ई. पुरस्कारासाठी मुलांची निवड केळी जाते.दरवर्षी ही परीक्षा वेगवेगळ्या देशामध्ये आयोजित करण्यात येते. यावर्षी या परीक्षेचे यजमानपद दक्षिण अमेरिकेतील ‘ कोलंबीया’ या देशाकडे असुन ४ जुलै ते १४ जुलै 2026 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. याच परीक्षेसाठी निशाची निवड करण्यात आली आहे. भारतात ही परीक्षा मुंबई येथील’ होमी भागा सायन्स सेंटर’ तर्फे घेतली जाते. निशा ही महाविद्यालयातील कामाबरोबरच होमी भाभा संस्थेत (Resorome Person) म्हणून १०-१२ वर्षे काम करीत आहे. याच बरोबर ती मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पीएचडीही करीत आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आणि सर्व कर्मचारी यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page