दुपारी अडीच ची घटना:सहा प्रवासी किरकोळ जखमी..
⚡सावंतवाडी ता.०७-: सांगलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी पर्यटकांची स्विफ्ट कार (एम.एच. ४३ एक्स ६९९५) माडखोल येथील सावली हॉटेलजवळील वळणावर पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
या कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते. अपघातात सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे काही काळ परिसरात गर्दी झाली होती. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास सुरू आहे.
