⚡सावंतवाडी ता.०७-:
सावंतवाडी येथील वैश्य वाणी युवा संघटनेच्या वतीने आमदार श्री. प्रमोद जठार यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अमित गवंढळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जठार साहेबांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि आगामी उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली.
या अभिनंदन सोहळ्याला वैश्य वाणी युवा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
अमित गवंढळकर (अध्यक्ष)अरुण भिसे,प्रशांत वाळके,प्रतिक कोरगांवकर,मेहेर पडते,श्रीधर बोंद्रे,प्रसाद नार्वेकर,नंदू पोकळे,कपिल कोरगांवकर,नित्यानंद कोरगांवकर हे उपस्थित होते
”समाजाच्या उन्नतीसाठी आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशी भावना यावेळी अध्यक्ष अमित गवंढळकर यांनी व्यक्त केली.
आमदार प्रमोद जठार यांनी देखील युवा संघटनेच्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, भविष्यातही सामाजिक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
