प्रवीण भोसले यांनी घेतली जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट…

प्रवीण भोसले यांनी घेतली जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट..

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत यांची आज माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर तसेच पुरुषोत्तम शेणई यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत तिरोडा येथील माऊली मंदिर तलाव संवर्धन, तिलारी पाणी व्यवस्थापन तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच खाशे-खाशेवाडी व रेडी यांना जोडणाऱ्या साकव (पूल) बांधकामाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुदेश राणे, पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र सावंत तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तिरोडा-शिरोडा पाणीप्रश्न, रेडी-नानोस व तिरोडा जोडणी तसेच तिरोडा गावातील जलजीवन मिशन योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व कामांचा नियमित आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
बैठकीनंतर उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त करत अध्यक्ष प्रमोदजी कामत यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page