Headlines

Global Maharashtra Breaking News

रोटरी क्लब कणकवली अध्यक्षपदी वर्षा बांदेकर

सेक्रेटरीपदी उमा परब; १ जुलै रोजी पदग्रहण सोहळा ⚡कणकवली ता.२८-: रोटरी क्लब सेंट्रल कणकवलीच्या १ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीतील नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सौ. वर्षा नितीन बांदेकर तर सेक्रेटरी पदी सौ. उमा परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा १ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा. भगवती मंगल कार्यालयात…

Read More

परदेशी शिक्षणाच्या संधी घेवून स्वतःसह जिल्ह्याचे नाव मोठे करा : समीर नलावडे

⚡कणकवली ता.२८-:परदेशी शिक्षणाच्या संधी घेवून स्वतःसह आपल्या जिल्ह्याच नाव मोठं करा. माहिती देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक आणि अशा संस्था करियर मार्गदर्शन आयोजित करतात ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बाब आहे त्याचा फायदा घ्या. त्याचप्रमाणे जेईई ,नीट, एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा देऊन करिअर घडवता येईल त्यासाठी सुद्धा या संस्था कार्यरत असून पालक आणि विद्यार्थी यांनी योग्य तो मार्ग…

Read More

व्हीं एम नाबर स्कूलचा मुलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन

⚡बांदा ता.२८-: कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित येथील व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कुल मधील एम.एस.एफ.सी विभागाच्या विद्यार्थ्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरती देसाई यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. एम. एस.एफ.सी विषयाअंतर्गत गुह आरोग्य विभागामधील आरोग्य विषयक प्रात्यक्षिक शिकवले जातात. या विभागातील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने आज प्रशाळेत डॉ. आरती…

Read More

जंगलात ओमणी गाडीत मिळाली दारू

कुणकेरी आयनाचे गाळू येथील प्रकार ⚡सावंतवाडी ता.२८-: कुणकेरी आयनाचेगाळू येथे जगंलमय परिसरात ओमनी गाडीत भरून ठेवलेली अवैध दारू साठ्यावर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली असून, २४ हजार च्या दारुसह ५० हजार ची ओमनी असा ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read More

दोडामार्ग तालुक्याचा वर्धापन दिन उत्साहात

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचा पुढाकार;रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे करण्यात आले होते आयोजन बांदा ता.२८-सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदूर्ग शाखा-दोडामार्ग,लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि दोडामार्ग आरोग्य विभाग यांच्या सहकार्यानेदोडामार्ग तालुक्याच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ५८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ५८ पैकी ०२ निगेटिव्ह…

Read More

उभादांडा येथे १ जुलै रोजी संयुक्त ‘इंद्रभक्त इंद्रभानू‘

⚡वेंगुर्ला ता.२८-: उभादांडा येथील केपादेवी मंदिरात शुक्रवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘इंद्रभक्त इंद्रभानू‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

Read More

हेलन केलर यांची जयंती साजरी

⚡वेंगुर्ला ता.२८-: अंधत्वावर विजय मिळविणारी जगप्रसिद्ध आणि कर्तृत्वसंपन्न अमेरिकन महिला व लेखिका हेलन केलर यांची जयंती २७ जून रोजी वेंगुर्ला येथे साजरी करण्यात आली.

Read More

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह भाई नरे, संदीप साटम यांचा सत्कार …

मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मिळवून दिला न्याय… ⚡कुडाळ ता.२८-: वीज पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी आपले कर्तव्य चोख बजावत असताना, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या राकेश मोंडकर आणि आनंद मिराशी या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर कंत्राटी कर्मचारी सघटनेच्या माध्यमातून नूतन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाई नरे आणि संदीप साटम या तिघांनी न्याय मिळवून देत सबंधित ठेकेदाराकडून भरघोस…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

⚡मालवण ता.२८-: स्पर्धा परीक्षेविषयी निःशुल्क जागृती करणारे तिमिरातून तेजाकडे चळवळीचे प्रणेते, कनिष्ठ सीमाशुल्क अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानात सत्यवान रेडकर यांनी विविध स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देत अभ्यासक्रम व परीक्षेची तयारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भंडारी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य आणि ओझर विद्यामंदिर…

Read More

नांगरतास येथे कार झाडाला आपटली

दोघे जखमी ⚡आंबोली, ता२८-: येथील नांगरतास येथे कार झाडाला आपटून अपघात झाला.यात दोघे जण जखमी झाले.सचिन पाटील वय ४२ आणि अमोल मुळीक वय ३४, रा.सांगली अशी जखमीची नावे आहेत.अपघातानंतर १०८ रुग्णवाहिका ने चालक अर्जुन राऊत यांनी आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले

Read More
You cannot copy content of this page