परदेशी शिक्षणाच्या संधी घेवून स्वतःसह जिल्ह्याचे नाव मोठे करा : समीर नलावडे

⚡कणकवली ता.२८-:
परदेशी शिक्षणाच्या संधी घेवून स्वतःसह आपल्या जिल्ह्याच नाव मोठं करा. माहिती देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक आणि अशा संस्था करियर मार्गदर्शन आयोजित करतात ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बाब आहे त्याचा फायदा घ्या. त्याचप्रमाणे जेईई ,नीट, एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा देऊन करिअर घडवता येईल त्यासाठी सुद्धा या संस्था कार्यरत असून पालक आणि विद्यार्थी यांनी योग्य तो मार्ग निवडावा असे मत कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘एस के फाउंडेशन आणि प्रज्ञा फाउंडेशन’ यांच्यावतीने आयोजित मोफत शैक्षणिक करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे उदघाट्न करताना व्यक्त केले.

यावेळी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, यु के येथून आलेले प्रमुख मार्गर्दशक राजेश कांबळे, आकाश मेश्राम,प्रज्ञा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप सावंत, रिव्होलूशन इन्स्टिटयूट चे ट्रस्टी सत्यवान मडवी, अच्युत देसाई,संदीप जाधव,ओंकार माडकर , गुरुकुल अकॅडमीचे प्रमुख दत्ता केसरकर,युनिक अकॅडमी कणकवलीचे संचालक आणि एस. के. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कोर्लेकर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक राजेश कांबळे यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये स्वतः शिक्षण आणि काम केल्याचा प्रत्यक्ष अनुभव सांगितला. तसेच परदेशी विद्यापीठातील शिक्षण पद्धती ही खूप अडव्हान्स असून वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी आहे त्यासाठी असणाऱ्या वेबसाईट्स कागदपत्रक याची संपूर्ण माहिती दिली. दुसरे मार्गदर्शक मा. आकाश मेश्राम यांनी परदेशी शिक्षणाचे अनेक अनुभव सांगितले तेथील शिस्तबद्ध अभ्यास पद्धती तेवढीच मनमोहक जीवनशैली बद्दल व परदेशात शिक्षणाला किती महत्त्व दिले जाते याची माहिती उपस्थितांना दिली. अशाचप्रकारच परदेशी शिक्षण घेण्यासाठी जावयाचे असल्यास त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आवश्यक ते सर्व सहकार्य एस के फाउंडेशन च्या वतीने केले जाईल त्याचबरोबर 12 वी नंतर तीन वर्ष पदवी करता करता एमपीएससी किंवा युपीएससी चा अभ्यास करून सरकारी अधिकारी कस होता येईल यासाठी विद्यार्थी व पालकांनी युनिक अकॅडेमी कणकवली येथे संपर्क साधून समजून घ्यावे असे आवाहन एस.के फाउंडेशन आणि युनिक अकॅडमी च्यावतीने सचिन कोर्लेकर यांनी केले आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील गरीब आणि होतकरू मुलांना कणकवली येथूनच जेईई आणि नीट या परीक्षांचे सखोल मार्गदर्शन उपलब्ध असून 10 वी नंतर दोन वर्षाच्या अभ्यासक्रमातून अनेक मार्ग विद्यार्थ्यांना निवडता येतात अशी माहिती रिव्होलुशन इन्स्टिटयूटचे ओंकार माडकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप सावंत यांनी तर सूत्रसंचालन सचिन कोर्लेकर यांनी केले.

You cannot copy content of this page