⚡बांदा ता.२८-: कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित येथील व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कुल मधील एम.एस.एफ.सी विभागाच्या विद्यार्थ्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरती देसाई यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
एम. एस.एफ.सी विषयाअंतर्गत गुह आरोग्य विभागामधील आरोग्य विषयक प्रात्यक्षिक शिकवले जातात. या विभागातील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने आज प्रशाळेत डॉ. आरती देसाई यांनी येत आरोग्य विषयक माहीती दिली. यामध्ये रक्तदाब, रक्तगट, हीमोग्लोबिन, न्युमोनिया तसेच आरोग्य विषयक काळजी कोणती घ्यावी याबाबत माहीती देण्यात आली. यावेळी सूरूवातीस प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी डॉ. देसाई यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देसाई, एम.एस.एफ. सी.विभागप्रमुख सौ. रिना मोरजकर, समन्वयक राकेश परब, निदेशक भिकाजी गिरप, निदेशिका सौ. रिया देसाई, सौ. गायत्री देसाई आदी उपस्थित होते. सौ. गायत्री देसाई यांनी आभार मानले.
