उभादांडा येथे १ जुलै रोजी संयुक्त ‘इंद्रभक्त इंद्रभानू‘

⚡वेंगुर्ला ता.२८-: उभादांडा येथील केपादेवी मंदिरात शुक्रवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘इंद्रभक्त इंद्रभानू‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

  या नाटकात पपू नांदोस्कर, संजय वालावलकर, आबा कलिगण, गोट्या येरागी, प्रथमेश खवणेकर, गौतम केरकर, सागर हनपाडे, सुहास माळकर, नारायण आसयेकर, प्रशांत मयेकर व तात्या गोडकर आदी कलाकार भूमिका साकारणार असून यांना मयुर गवळी (हार्मोनियम), बाबा खानोलकर (पखवाज) व आकाश खानोलकर (तालरक्षक) आदी संगीतसाथ करणार आहेत. तरी यावेळी नाट्यरसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापक केपादेवी देवस्थानतर्फे केले आहे.
You cannot copy content of this page