सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचा पुढाकार;
रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे करण्यात आले होते आयोजन
बांदा ता.२८-
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदूर्ग शाखा-दोडामार्ग,लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि दोडामार्ग आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने
दोडामार्ग तालुक्याच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ५८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ५८ पैकी ०२ निगेटिव्ह रक्तगट सापडले.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अरुण खानोलकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे,प्राचार्य डॉ.सुभाष सावंत,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,दोडामार्ग अध्यक्ष विवेकानंद नाईक,उपाध्यक्ष जयवंत तुळसकर व महिला उपाध्यक्षा सौ.गीतांजली सातार्डेकर,सचिव संतोष सातार्डेकर,एन.एस.एस.विभागाचे प्रा. दिलिप बर्वे,प्रा.श्री. इंगळे,दोडामार्ग तालुका आरोग्य विभागाचे कार्यक्रम सहाय्यक तथा प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख अजित सावंत,आरोग्य सेविका श्रुति शिरोडकर,रेश्मा क्षीरसागर,रजनी बुटे,आरोग्य परिवेक्षक सदाशिव आयनोडकर,प्रतिष्ठानचे सहसचिव वैभव रेडकर,रामकृष्ण दळवी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा.श्रीपाद पाडगावकर यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्गच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय,एन.एस.एस.विभाग, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान,दोडामार्ग आरोग्य विभाग यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन भूषण सावंत यांनी केले तर प्रास्ताविक संतोष सातार्डेकर यांनी केले तर आभार प्रा.बर्वे सरांनी केले.
