⚡वेंगुर्ला ता.२८-: अंधत्वावर विजय मिळविणारी जगप्रसिद्ध आणि कर्तृत्वसंपन्न अमेरिकन महिला व लेखिका हेलन केलर यांची जयंती २७ जून रोजी वेंगुर्ला येथे साजरी करण्यात आली.
गटसाधन केंद्र वेंगुर्लातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी विषयतज्ज्ञ शिवानी आळवे व विठ्ठल सावंत यांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी मिलिंद टिळवे, प्रविण बावलेकर, तेजस्विनी तांडेल, संजिव बुच्छलवार, सर्वेश राऊळ, शिलकांत कावले, अनिल भोकरे आदी उपस्थित होते.
हेलन केलर यांच्या आयुष्यात फक्त अंधकारच होता. परंतु, त्यांनी आपल्या हिमतीवर आणि चिकाटीने आपलेच नाहीतर आपल्यासारख्या हजारो जणांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला. जगण्याची नवी उमेद दिली. दिव्यांगांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ते सुद्धा इतरांपेखा कमी नाहीत, याची प्रचिती जगाला दिली. दिव्यांग शिक्षणाचे धडे गिरवू शकतील असे विपूल साहित्य हेलन केलर यांनी निर्माण केले असल्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. मिलिंद सरवदे यांनी सूत्रसंचालन केले.
