मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मिळवून दिला न्याय…
⚡कुडाळ ता.२८-: वीज पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी आपले कर्तव्य चोख बजावत असताना, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या राकेश मोंडकर आणि आनंद मिराशी या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर कंत्राटी कर्मचारी सघटनेच्या माध्यमातून नूतन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाई नरे आणि संदीप साटम या तिघांनी न्याय मिळवून देत सबंधित ठेकेदाराकडून भरघोस अशी मदत मिळवून दिली आहे. त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अशाच प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देखील दिली आहे.
त्यांनी केलेल्या या कामामुळे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मिठबाव सरपंच भाई नरे, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम आणि नूतन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. संदीप बांदेकर, श्री. आनंद लाड, श्री. संजय गोवेकर, श्री. महेश राऊळ, श्री. विठ्ठल साळकर, श्री. सर्वेश राऊळ, योगराज यादव, अमोल वाडकर, चेतन सावंत, मोहन गावडे, दर्शन देसाई, रुपेश जाधव, सुधीर तेली, अनिल घाडी, पुरुषोत्तम राणे, जितेंद्र बड, अभय जोशी, कृष्णा पवार, श्रीकृष्ण शिर्के, जयेंद्र कुंभार , संदेश देवरुखकर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच कंत्राटी उपस्थित होते.
