Headlines

माडखोलमध्ये कृष्णा राऊळ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा…

शाळेला ब्लूटूथ स्पीकर, माजी सैनिकांचा गौरव; स्वामी समर्थ मठाला इन्व्हर्टर-बॅटरीची भेट..

⚡सावंतवाडी ता.११-: माडखोल गावचे उपसरपंच तथा माडखोल सेवा संस्था सोसायटीचे चेअरमन कृष्णा राऊळ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून राऊळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थ व विविध संस्थांना उपयोगी वस्तूंची भेट देत आपला वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा केला.
माडखोल प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरणारा ब्लूटूथ स्पीकर भेट देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माडखोल गावातील माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांना हुतात्मा स्मारकाची प्रतिमा भेट देण्यात आली. माडखोल येथील श्री स्वामी समर्थ मठासाठी इन्व्हर्टर व बॅटरी भेट देण्यात आली. या सुविधेमुळे मठातील वीजपुरवठ्याची सोय अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या प्रेम, शुभेच्छा आणि सहकार्याबद्दल उपसरपंच कृष्णा राऊळ यांनी मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि सर्व शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले.

You cannot copy content of this page