Headlines

संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या ६७ प्रकरणांना मंजुरी

कणकवली : कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा बुधवार ९ सप्टेंबर २०२६ रोजी तहसीलदार कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध शासकीय योजनांअंतर्गत एकूण ६७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

ही सभा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी गौरी पाटील, नायब तहसीलदार विजय वरक, सदस्य सुजाता हळदिवे, विजय कातरुड, दीपक दळवी, गुरुनाथ वर्देकर, विजय भोगटे, भगवान दळवी, विलास गावकर, गजानन शिंदे, संजय गांधी शाखा कर्मचारी आदी उपस्थित होते.

सभेमध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ४२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तसेच श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट-अ अंतर्गत १७, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट-ब अंतर्गत ४ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत ४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

अशा प्रकारे विविध सामाजिक सुरक्षा व निवृत्तीवेतन योजनांअंतर्गत एकूण ६७ लाभार्थी प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने संबंधित गरजू लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सदर प्रकरणांची मंजुरी समितीच्या सभेत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

You cannot copy content of this page