लाडक्या गणरायाच्या आगमनापाठोपाठ गौराईचे आगमन
⚡कणकवली ता.०३-: कोरोनाची भयछाया दूर झाल्यानंतर सण आणि उत्सवांवरील निर्बंध हटविल्यामुळेयंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असून लाडक्या गणरायाच्या आगमनापाठोपाठ शनिवारी म्हणजे गौरींचे कणकवली तालुक्यात घरोघरी उत्साहात आगमन झाले. गौरी आगमनाप्रसंगी महिलांचा दांडगा उत्साह दिसून आला.भक्तीमय वातावरणात मृदुंग-टाळ यांच्या गजरात सकाळी ‘गौराई आली सोन्या मोत्याच्या पावलांनी’ आगमन घरोघरी झाले. कोकणात खड्यांच्या आणि मुखवट्याच्या अश्या दोन प्रकारात…
