नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.०३-:
कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील महापुरुष सेवा संघाच्या वतीने व कै.पार्वती कृष्णा कांदळकर,कै.पुष्पलता आप्पा कांदळकर व कै.निर्मला कांदळकर यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नांदगाव महापुरुष संघाच्या वसंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच व महापुरुष सेवा संघाचे अध्यक्ष शशिकांत शेटये, वसंत कांदळकर, आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू मेधाली म्हसकर, अनिल म्हसकर, अजित महाजन, प्रकाश महाजन,विजय महाजन, आदी उपस्थित होते.
10 वी 12 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी यांचा सत्कार भेट वस्तू , सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर शेटये,तर आभार माजी सरपंच संजय पाटील यांनी मानले आहेत.

You cannot copy content of this page