आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलीसांना पदोन्नती

सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी केले अभिनंदन

⚡मालवण ता.०३-: ऐन चतुर्थी उत्सवात जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीसांना पदोन्नती देत पोलीसांना सुखद वार्ता दिली होती.यात आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
देवगड पोलीस स्थानकातील ७ पोलिसांना पदोन्नती!
देवगड
सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनातील . सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक . पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांच्या पदोन्नतीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी काढले होते.यात आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेश देसाई यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली. पोलीस नाईक पदी असलेल्या सौ स्वाती आचरेकर, दिलीप चव्हाण, मनोज पुजारे या तिघांना हवालदार पदी बढती मिळाली.पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page