भाजपचे युवा नेतृत्व संजय नाईक यांना वाढदिवसानिमित्त शूभेच्छा
⚡सावंतवाडी ता.०३-: कुठचीही अपेक्षा न करता राजकारण समाजसेवेत झोकुन देऊन आपला वेळ देणारे युवा नेतृत्व संजय नाईक. नारायण राणे यांचा निष्ठावंत शिलेदार. भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सचिव तसेच कोकण सम्राट ग्रृपचे सर्वेसर्वा यांचा आज वाढदिवस ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धावता आढावा.
साटेली तर्फ सातार्डा या ग्रामिण भागातील अतिशय गरीब घराण्यातील विश्वासाने आणि निष्ठेने साटेली गावची राजकिय आणि सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात काम करुन आज संपुर्ण जिल्ह्यात ओळख आणि वेगळा ठसा उमठवणारे संजय नाईक, प्रत्येक निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजन याच्यात अतिशय महत्वाची भुमिका सिंधुदुर्ग गोव्यात बजावत असतात. गोव्यात तर सध्याच्या मोठमोठ्या दिग्गज मंत्री मुख्यमंत्री यांच्या प्रचार आणि रणनितित त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता! मुख्यमंत्री श्री.प्रमोद सावंत आरोग्यमंत्री श्री.विश्वजित राणे.सौ.दिव्या राणे.क्रीडा मंत्री श्री.गोविंद गावडे आमदार श्री.पेमेद्र शेट.आमदार श्री.प्रविण आर्लेकर.आमदार कु.जोसवा म्हापसा यांच्या मतदार संघात सेंट्रल टिम सोबत नियोजन करुन १००% जबाबदारी पुर्ण केली. तसेच विधानसभा अध्यक्ष श्री.राजेश पाटणेकर श्री.माजी आमदार सोपटे यांच्यासाठी ही विशेष लक्ष होता. पण कुठच्याच निवडणुकीच श्रेय घ्यायला न थांबता काम करत रहाण हि त्यांची खासीयत आहे. आज जिल्ह्यात राणे कुटुंबीय आणि मोठमोठे केंद्रियमंत्री कॅबिनेट मंत्री, आमदार ,नगराध्यक्ष, नगरसेवक,सभापती ,जिल्हापरीषद सदस्य,सर्वच पदाधिकारी यांची खास ओळख असुनही मोठेपणा न करता,राणे कुटुंबिय आणि पक्षासाठी अतोनात मेहनत आणि सर्वांशी अत्यंत प्रेमळ मनमिळावु स्वभावामुळे संजय नाईक यांनी एक वेगळी गावाची आणि स्वत;ची ओळख तयार केलीय. भाजपसाठी हा राणेंचा शिलेदार नक्कीच पक्षसंघटनेत यशस्वी कामगिरी १००% करणार यात शंका नाही. दादा राणे कुटुंब आणि भाजप पक्ष यासाठी या युवा नेतृत्वाची दमदार कामगिरी हे नेतृत्व नक्कीच अजुन मोठमोठ्या सफलतेकडे पोहचु दे! हीच आजच्या वाढदिवसा दिनी ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलकडून शुभेच्छा!
