वैभववाडी प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नदीमध्ये पाणी साचून राहिले पाहिजे या साठी सांगुळवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत लोक वर्गणी जमा करून नदीतील गाळ काढण्याचे काम केले. या कामाचे सांगुळवाडी ग्रामस्थांचे संपूर्ण तालुकाभर कौतुक होत आहे.
लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील सांगुळवाडी गावातील ग्रामस्थांनी माजी सरपंच तथा भाजपा शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून नदीतील कोंडी मध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम केले यामुळे सांगुळवाडी गावातील ग्रामस्थांचे संपूर्ण तालुका व कौतुक होत आहे. गेले चार दिवस हे काम चालू होते. या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार यांनी भेट दिली. ग्रामस्थांनी एकजुटीतून केलेल्या कामाचे कौतुक केले.यावेळी भाजपा शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील. उद्योजक विकास काटे. सत्यवान सुतार. रितेश सुतार आणि सांगुळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

