बांदा/प्रतिनिधी
काजू आणि मिरची पिकांचे उत्पादन वाढविण्यासह आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि शेतीतील विविध समस्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने नेचर ऑर्गॅनिक्स व के.जी.एस. परिवार, कुडाळ यांच्या वतीने गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मडुरा येथे काजू-मिरची पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हे चर्चासत्र दुपारी ३ वाजता मडुरा येथील सावित्री शंकर मंगल कार्यालय, मडुरा तिठा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला नेचर ऑर्गॅनिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शशिकांत (दादा) पुरमवार, मार्केटिंग मॅनेजर गोविंद मोदी, कुडाळ शाखाप्रमुख वैभव बखले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
चर्चासत्रात कंट्री हेड दत्तात्रय फेरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, नेचर ऑर्गॅनिक्सचे अॅग्रोनॉमिस्ट सतीश पाटील आणि मार्केटिंग मॅनेजर सचिन काळे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. काजू व मिरची उत्पादक शेतकऱ्यांना पिकांच्या योग्य व्यवस्थापनाबाबत तसेच उत्पादनवाढीसाठी उपयुक्त माहिती मिळावी, हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे. परिसरातील काजू व मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी या चर्चासत्राला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सागर नाईक (९१५८१२३०१०), बांदेश्वर कृषी सेवा केंद्र, बांदा (९४०४४९७३८४) किंवा प्रकाश वालावलकर (९४२३८०५५०८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

