Global Maharashtra Breaking News

टायर फुटून डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात…

भडका उडाल्याने टँकर जळून खाक; सुदैवाने चालक आणि क्लिनर वाचला… मालवण (प्रतिनिधी) सांगलीहुन चौके मालवण येथील भगवती पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल घेऊन येणाऱ्या भगवती पेट्रोल पंपाचा टँकर (एम.एच. ०७ पी १२१२) शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सावरवाड येथील गणेश मंदिरनजीक आला असता अचानक मागील चाकाचा टायर फुटल्याने टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात टँकर मधील…

Read More

मच्छीमारांनी मासेमारीचा हक्क सांगण्यासाठी संघर्षात तयार राहावे

जेष्ठ मच्छीमार नेते सिमन्स यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी केंद्र सरकारची सागरमाला योजना तसेच सीआरझेड २०१९ ची अधिसूचना पाहता येत्या काळात किनारपट्टीवरील सागरी मच्छीमारांना मच्छीमार म्हणून आपले अस्तित्व टिकवणे कठीण होणार असल्याने।मच्छिमारानी समुद्रातील मासेमारीच्या हक्कासाठी संघर्षास तयार राहावे असे प्रतिपादन नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे जेष्ठ नेते ओलॅन्सिओ सिमन्स यांनी येथे बोलताना केले. देशभरातील मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी…

Read More

दूध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा बँकेचा पुढाकार

३९ व्या वर्धापदिनानिमित्त केला शुभारंभ;१०१ उत्पादकांना केले कर्ज वाटप ⚡ओरोस ता.०१-: जिल्ह्यात पांढरी गंगा आणून जिल्ह्यातील दूध उत्पादन एक लाखापर्यंत नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे. यासाठी सध्या दूध उत्पादन घेवून चांगल्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादकांना जिल्हा बँकेने कमी व्याजदरात कर्ज वितरण करण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या बँकेच्या ३९ व्या…

Read More

डॉक्टर डे निमित्त डॉ. साई पित्रे यांचा करण्यात आला सत्कार …

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफीक खान यांनी केला सत्कार; कोरोना काळात केलेल्या कामाचे केले कौतुक… ⚡सावंतवाडी ता.०१-: डॉक्टर दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफीक खानसाहेब, आसिफ ख्वाजा आणि जहिरा ख्वाजा यांनी डॉ. साई पित्रे यांचा सत्कार केला असून, कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

Read More

कृषीदिनानिमित्त शिरवंडे हायस्कूल येथे वृक्षारोपण

⚡कणकवली ता.०१-: हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिनाचे औचित्य साधुन त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे मुख्याध्यापक वामन तर्फे, कृषी विज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष प्रदिप सावंत, अधिकारी श्री. भोसले , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री. भोसले आणि हरित सेना प्रमुख श्री. काणेकर, कृषी महाविद्यालय, किर्लोसच्या…

Read More

तेली समाज उन्नती मंडळाची 24 रोजी वार्षिक सभा व गुणगौरव समारंभ

⚡कणकवली ता.०१-: तेली समाज उन्नती मंडळाची सन २०२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ रविवार २४ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. ओरोस ‘ईच्छापूर्ती’ हॉल, गोविंद सुपर मार्केटजवळ (मुंबई गोवा हायवे) येथे आयोजित केला आहे. मंडळाच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे. यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. सन २०२२ च्या दहावीच्या…

Read More

चिंदरचे गावचे सुपुत्र आत्माराम नाटेकर यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारीनीवर निवड….

⚡मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील चिंदर गावचे सुपुत्र आत्माराम नाटेकर(सध्या रा. मुंबई) यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणूकीत कार्यकारीनीवर बहुमताने निवड झाली आहे. गेली 33 वर्षे लोकसत्ता मध्ये कार्यरत असलेल्या नाटेकर यांची हि निवड पाचव्यांदा झालेली आहे.लोकसेवा समिती डोंबीवलीचे माजी अध्यक्ष असलेले नाटेकर हे सामाजिक, साहित्य क्षेत्रात नेहमी कार्यरत असतात. त्यांच्या या निवडी बद्दल मुंबई…

Read More

रोटरी क्लब मालवण कडून स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कृषी दिन साजरा

⚡मालवण ता.०१-: राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मालवण रोटरी क्लब आणि मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या प्रांगणात राेटरी क्लब मालवणचे माजी अध्यक्ष राे. उमेश सांगाेडकर व प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी रो. उमेश सांगोडकर…

Read More

दहा हजार वृक्ष लागवडीचा वेंगुर्ल्यात शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.०१-: ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज कृषी दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करुन करण्यात आला.

Read More

हुंबरट ग्रामपंचायत कार्यालय येथे
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अनावरण

⚡कणकवली ता.०१-: कणकवली तालुक्यातील हुंबरट ग्रामपंचायत कार्यालय येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्याचे अनावरण हुंबरट सरपंच सौ. अर्चना अरविंद वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ग्रामपंचापत सदस्य संदीप होळकर, सदानंद जाधव,सौ साक्षी दळवी, ग्रामसेवक वैभव ठाकुर, मुंबई मंडळ कार्यकर्ते मंगेश दळवी , पोलीस पाटील बाबू गुरव, माजी सरपंच दिलीप मर्ये, रमेश दळवी,महेंद्र पांचाळ , दीपक दळवी…

Read More
You cannot copy content of this page