⚡मालवण ता.२०-: मालवण बाजारपेठेतील श्री देवी भैरवी मंदिर याठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त भजन महोत्सव २०२२ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत श्री देवी भैरवी मंदिर, संतसेना मार्ग सोमवार पेठ याठिकाणी दररोज रात्री ८ वाजता भजन सेवा सादर करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नामवंत भजनीबुवांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन डबलबारी भजनाचे प्रसिद्ध बुबा गुंडू सावंत ( वर्दे ता. कुडाळ) यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे यावेळी दहावे वर्ष आहे. यावेळी नाभिक समाजाचे नेते विजय सीताराम चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, उद्योजक अनिल मालवणकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भजनीबुवा गुंडू सावंत यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सादर होणारी भजने पुढीलप्रमाणे:- २६ सप्टेंबर रोजी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा पखवाज- विराज बावकर श्री गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ श्रावण गुंडू सावंत गवळीवाडी बुवा – संजय चव्हाण (पखवाज- संकल्प चव्हाण), २७ रोजी श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ भोगवे बुवा मदन करलकर, २८ रोजी अष्टपैलू कलानिकेतन मालवण बुवा सुनिल परूळेकर, २९ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ आनंदव्हाळ बुवा पप्पू सामंत ३० रोजी श्री रेकोबा प्रासादिक भजन मंडळ सुतारवाडी वायरी बुवा अक्षय परूळेकर, १ ऑक्टोबर रोजी श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कातवड मालवण बुवा मंगेश नलावडे, २ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ न्हिले कोळंब मालवण बुवा – राजन दळवी, सिद्धेश पाताडे, ३ रोजी आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव कातवड बुवा – चेतन धुरी, ४ रोजी सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव देऊळवाडी बुवा – राजेंद्र कोदे, पखवाज- बंटी कांदळगावकर, दत्ताराम डिकवलकर ५ रोजी
अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ साळेल बुवा अंकिता गावडे. या महोत्सवात रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, विजय चव्हाण, ललित चव्हाण, जगदीश वालावलकर यांनी केले आहे.
