अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई…

चार डंपर घेतले ताब्यात

मालवण दि प्रतिनिधी
अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी मालवण महसूल पथकाने काळसे व कुंभारमाठ मार्गावर केलेल्या कारवाईत चार वाळू वाहतूक डंपर ताब्यात घेतले आहेत. चारही डंपर पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालय येथे आणण्यात आले असून डंपर मालकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. अशी माहिती मालवण तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने मंगळवारी देण्यात आली.

कुंभारमाठ मार्गांवर मंडळ अधिकारी मालवण यांच्या पथकाने अवैद्य वाळू वाहतूक प्रकरणी जी ए ०९ यु ८८४४ या डपरची तपासणी केली असता त्यात 3 ब्रास वाळू वाहतूक पास परवाना नसताना सापडून आली. तसेच त्याच मार्गावर जीए ०९ यु ८१२३ या डंपरची तपासणी केली असता त्यातही तीन ब्रास वाळू वाहतूक पास नसताना सापडून आली आहे. तसेच काळ हुबळीचा माळ मार्गावर मंडळ अधिकारी यांच्या पथकाने जी ए ०४ टी २५८८ या डंपरची तपासणी केली असता दोन ब्रास वाळूची वाहतूक पास नसताना दिसून आली. तर त्याच मार्गावर एम एच ०७ सी ६९१४ या डंपरची तपासणी केली असता यात दोन ब्रास वाळू गौण खनिज वाहतूक परवाना नसताना सापडून आली. अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी चारही डंपर मालवण तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहेत. तर डंपरवर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये याबाबतचा लेखी खुलासा सादर करावा अशी नोटीस मालवण तहसीलदार यांच्या वतीने चारही डंपर मालकांना बजावण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी टी डी लोबो, वायरी तलाठी व्ही एम राठोड, मालवण तलाठी व्ही एन पास्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

You cannot copy content of this page