⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दिंडीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुभाष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्था संचालक संजय आग्रे, संदेश पटेल, शेखर लिंग्रास, आनंद मर्ये, रंजन नेरूरकर, बबन पवार, राजू पटेल यांसह इतर संचालक मुख्याध्यापक सावंत व प्राचार्य फुलझेले व सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.दिंडी फोंडा बसस्थानक ते राधाकृष्ण मंदिर बाजारपेठ करत ते मारुती मंदीर येथे समाप्ती करण्यात आली. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
फोंडाघाट येथे वारकरी दिंडीला प्रतिसाद
